You are currently viewing गुलाबस्तवन……३७ वे

गुलाबस्तवन……३७ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन……३७ वे*

 

आयुष्याची कृतज्ञता मोजायची

माझ्या मातीनं ठरवलं

गुलाबांचे ईश्वरी सौंदर्य

तिनं आयुष्यभर जपलं…

 

रूसवे फुगवे जपून

दिवसरात्र बाळांना सांभाळलं

कृतज्ञतेचा निर्देशांक मोजून

जगण्याचं अंगण बहरलं..

 

अनंत फुलांच्या शय्येवर

परमेश्वर विराजमान झाले

प्रेमरूप शांतमनोहर अंगण

शुभ्र दूधगंगेत न्हाले…

 

मातीनं जपलं मला

जगण्याचा आनंद दिला

ह्दय आभाळाएवढे तुझे

ईश्वरही उठून बसला…

 

रूप सजलं कुसुमगंधानी

भूवरती चंद्रमंडल पसरले

विश्वविणा गात अभंग

प्राण ह्दयातळी उतरले…

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा