You are currently viewing राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना* *भाग १*

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना* *भाग १*

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा, संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना*
*भाग १*

राजीव गांधी एक उभरत व्यक्तिमत्त्व आपल्याला लाभल होते ‌ इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली राजीव गांधी आपल्या भारत देशांचे पंतप्रधान झाले. डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी ह्यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते. राजीव गांधी यांनी सत्तेवर येताच २१ वे शतक आधुनिकीकरण. नवे शैक्षणिक धोरण. संगणकीकरण. पंचायत राज्य. पक्षांतर बंदी. गंगा शुध्दीकरण. जवाहर रोजगार योजना. इत्यादी जन कल्याण कार्यक्रम हाती घेतले. तंत्रज्ञान विज्ञान क्षेत्रात संदेश दळणवळण व्यवस्थेत इलेक्ट्रॉनिक विकास घडविला देशात महासंगणक सुपर कॉम्प्युटर आणणारे पहिलें पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी होय.
आसाममध्ये बोडो प्रश्न चिघळला बोडो बंडखोरांनी हिंसाचार करुन आसाममधील लोकनियुक्त सरकारला कोंडीत पकडले ह्याचा परिणाम म्हणजे ह्या दोन राज्यकर्त्यांत फुट पडली ह्या दोन्ही प्रश्नात पंतप्रधान राजीव गांधी यांना अपयश आले ‌हया पेक्षा वेगळे म्हणजे व्यक्तिगत कर्तबगारी म्हणजे त्यांनी. उतसवा चे सार्वत्रिकीकरण घडवून आणले * भारतीय उत्सव* अपना उत्सव* असे उपक्रम योजून एकात्मता साधण्याचा प्रयत्न राजीव गांधी केला * काॅग्रेस शताब्दी* प्रतिकात्मक दांडी यात्रा* राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावणे.* ‌असे उत्सवी कार्यक्रम आखून राष्ट्रीय एकात्मता आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थातच चांगले पचल नाही आणि रुचले नाही या प्रयत्नांना राजीव गांधी यांना काही फारसे यश आलं नाही उलटं त्यांच्यावर टिकाही करण्यात आली
राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना जनतेसाठी जशी भरिव कार्यक्रम आखले तसेच कार्यक्रम इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणारे सदन अथवा दुर्बल कुटुंबातील मुलांच्या साठी विविध योजना तयार केल्या त्यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सर्वात प्रथम ही योजना सुरू करण्यासाठी दिनांक २० आॅगसट २००३ रोजी पहिला शासन निर्णय काढण्यात आला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ११ जुलै २०११ रोजी दुसरा शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले. आणि त्यांनंतर १ आॅकटोबर २०१३ रोजी अजून एक परिपत्रक जारी करण्यात आले. पण प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचें पत्र प्राशिस / २०२१ -२२ रागाविअसाअयो सुधारणा/ २०४ दिनांक १३ आॅगसट २०२१ रोजी शासनाने विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची सुधारणा व अंमलबजावणी होण्यासाठी परिपत्रक जारी केले . पण अजूनही दुर्बल घटकांपर्यंत योजना पोहचत नाही त्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे शासकीय अधिकारी व कर्मचारी जाहिरात. प्रचार ‌ प्रसार. प्रबोधन. संबोधन. याचा अभाव आज आपणांस पाहावयास मिळतो .
विद्यार्थ्यांना अपघातामुळे व त्या कुटुंबातील लोकांना मुलांच्या अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांसाठी* राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना* विमा कंपनी मार्फत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २० आॅगसट २००३ पासून राबविण्यात आली आहे ‌. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विमा हप्ते एकत्रितरित्या शासनाकडून विमा कंपन्या यांना अदा करण्यात येत आहेत.
विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान देताना टाळाटाळ करीत होत्या किंवा उशिर लावत होत्या विद्यार्थ्यांच्या अपघातांचे दावे लवकर निकाली लागत नसल्याने ही योजना विमा कंपन्या मार्फत बंद करून त्या ऐवजी “” सानुग्रह अनुदान योजना “” प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने संदर्भाधीन शासन निर्णय दि ११ जुलै २०११ अन्वये घेतला सदर योजना दि २७/०८/२०१० ते २६/०८/२०१२ पर्यंत राबविण्यात आली.
प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबविण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावीरीत्या अंमलबजावणी झाली असून मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे ‌या योजनेची फलश्रुती ध्यानात घेता ही योजना दि २७ आॅगसट २०१२ पासून नियमित स्वरुपात सुरू करण्यात आली आहे. सन २०१३ पासून वाढलेली महागाई व विद्यार्थी अपघात वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने प्रस्तुत योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय व अटी शर्ती घालून ही योजना सापेक्ष पणे राबविण्यासाठी कडक नियम केले आहेत व तसा आदेश सुध्दा देण्यात आला आहे
शासन निर्णय क्रमांक पी आर इ / २०११/ प्र क्र / प्राशि_ १ दि १ आकटोंबर २०१३ अन्वये राबविण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह योजना खालील सुधारणासह नियमित स्वरुपात राबविण्यात यावी सदर योजना ही इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या या सर्व मुलांना मुलींना लागू राहील. सदर योजनांमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात/ जखमी झाल्यास सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
** विद्यार्थी अपघात मृत्यू मिळणारी रक्कम १ लाख ५० हजार सोबत दाखल करायची कागदपत्रे तीन प्रति मध्ये
* प्रथम खबरी अहवाल
* स्थळ पंचनामा
* इनलकवेसट पंचनामा
* सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरी केलेलें मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत दाखला सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरी सह
** अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास १ लाख ( २ अवयव/ दोन डोळे किंवा १ अवयव व १ डोळा निकामी) कागदपत्रे अपंगत्व कारणाबाबतचे डॉ यांचे प्रमाणपत्र प्रति स्वाक्षरी सह कायमचे अपंगत्व प्रमाणपत्र
** अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास ( १ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी लाभ रूपये ७५ हजार सिव्हिल सर्जन यांचे कायमचे अपंगत्व अस प्रमाणपत्र
** विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास सर्व दवाखान्याचा उपचार खर्च १ लाख रुपये . शस्त्रक्रियेबाबत दवाखान्याचे प्रमाणात सिव्हिल सर्जन यांच्या प्रति सवाक्षरीसह
** विद्यार्थी आजारी पडून. सर्पदंश. किंवा पोहताना मृत्यू झाल्यास लाभ १ लाख ५० हजार . सिव्हिल सर्जन सवाक्षरीत केलेलं शवविच्छेदन बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला
** विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास ( क्रिडा खेळ खेळताना. शाळेतील जड वस्तू अंगावर पडून. आगीमुळे. विजेच्या धक्क्याने. वीज अंगावर पडून) अपघात झाल्यास दवाखान्याचा खर्च कींवा जास्तीत जास्त रूपये १ लाख . दवाखान्याचे उपचार बाबतचे प्रमाणात सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरी सह
बांधकाम कामगार व, इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =