You are currently viewing पावसाळ्यातील साथ रोग आणि डास निर्मूलनाची मोहीम हाती न घेतल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल – तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा इशारा

पावसाळ्यातील साथ रोग आणि डास निर्मूलनाची मोहीम हाती न घेतल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल – तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा इशारा

सावंतवाडी / प्रतिनिधी :

शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे चिखलाचे साम्राज्य पसरले असून ठीक ठिकाणी दुर्गंधी आणि डास उत्पत्ती होत आहे. तरी याकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नागरिकांसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी शहरांमध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वी पासून धुवाधार पर्जन्यवृष्टी झाली गटार आहे. खोदायी न झाल्यामुळे गटारातील माती चिखल आणि सांडपाणी रस्त्यावर आले आहे. पाऊस प्रचंड असल्यामुळे उंच भागावरून सकल भागात मोठ्या प्रमाणात माती आली आहे. रस्त्यावर सुद्धा मातीचे ढिगारे असून रस्त्याला पडलेले खड्डे आणि ढिगारे यामुळे रस्ते धोकादायक बनले आहेत. सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील वेधशाळेसमोर मोठ्या प्रमाणात माती डोंगरावरून वाहून रस्त्यावर पसरले आहेत.

तर याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर जि. प. शाळा नंबर सहा च्या समोर मोठा रस्त्याला चर खोदण्यात आला असून त्या ठिकाणी अपघातक्षेत्र निर्माण झाले आहे. गोविंद चित्र मंदिर समोरून जाणाऱ्या रस्त्याला दोन भगदाड पडले असून केवळ भटवाडीत नव्हे तर शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुळे बनले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी सांगेलकर यांनी केली आहे.

दरम्यान लोकवस्ती जवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठले आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. सायंकाळचे सहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होत असल्याने डास निर्मूलनाची मोहीम नगरपरिषद प्रशासन आणि हाती घ्यावी, अशी मागणी सांगेलकर यांनी केली आहे. गटारामध्ये सांडपाणी सोडले गेल्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता असून ठिकठिकाणी औषध फवारणी करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शहरातील विहिरी सार्वजनिक आणि खाजगी विहिरी माती युक्त दूषित पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. या विहिरीतील पाणी दूषित झाले असून या विहिरीमध्ये जंतू निर्मूलन औषध टाकून पिण्यायोग्य पाणी  करण्याची गरज आहे. पावसाळ्यातील साथ रोग उद्भवू नये याची काळजी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने घ्यावी, अशी मागणी सांगेलकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा