You are currently viewing नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाच्या नियमावली जाहीर

नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाच्या नियमावली जाहीर

 

*मुंबई प्रतिनिधी:*

* स्नेहा नाईक *

कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे तसेच राज्य शासनाद्वारे देखील मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व कार्यपद्धतीनुसार आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने मूर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी देण्याविषयी अधिक सुलभ कार्यपद्धती आणि ‘कोविड’ संदर्भातील हमीपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे.

▪️ नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे तसेच राज्य शासनाद्वारे देखील मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत.

– ▪️सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

– ▪️देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादित ठेवावी

गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत.

– ▪️आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.

– ▪️रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.

– ▪️रावण दहनाकरिता किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी

– ▪️देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

– ▪️देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

– ▪️मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 8 =