You are currently viewing आम.प्रकाश आवाडे यांची सतेज पाटील यांच्यावरील टीका द्वेष भावनेतून : शशांक बावचकर

आम.प्रकाश आवाडे यांची सतेज पाटील यांच्यावरील टीका द्वेष भावनेतून : शशांक बावचकर

आम.प्रकाश आवाडे यांची सतेज पाटील यांच्यावरील टीका द्वेष भावनेतून : शशांक बावचकर

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांची माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांच्यावरील टीका द्वेष भावनेतून असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव,माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे की ,
गेल्या दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहरातील वाहनधारकांसाठी ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ मंजूर झालेबाबत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. हे करत असताना त्यावेळी त्यांनी मागील महाविकास आघाडी सरकारने व तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी जाणीवपूर्वक माझे काम नाकारले अशा पद्धतीची टीका केली. याबाबत वस्तुस्थितीची पाहणी केली असता महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘ब्रेक टेस्ट ट्रॅकची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्याचे पत्र सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर यांना दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी दिले होते. दिनांक २ मार्च २०२३ रोजीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक’ मंजुरी बाबतचा शासन निर्णय पाहिला असता त्यामध्येही पूर्वीच्याच अटींचा व त्रुटींचा उल्लेख करून सदर ब्रेक टेस्ट ट्रॅकला सशर्त परवानगी देण्याचा शासन निर्णय झाला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक २८ ला अनुसरून दि. २८ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या स्पष्टनिर्देशाचाही उल्लेख आहे. असे असताना विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे
शहरातील जनतेची व वाहनधारकांची दिशाभूल करत असून त्यांनी गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात महाविकास आघाडीवर टीका करण्याव्यतिरिक्त कोणतेही भरीव काम केले नाही. केवळ द्वेष भावनेतून टीका करणे व जनतेची खोटी सहानभूती मिळवणे इतकेच काय ते काम सध्या सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी या प्रसिद्धी पञकात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =