You are currently viewing कमर्शियल सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना महागाईपासून काही अंशी दिलासा

कमर्शियल सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना महागाईपासून काही अंशी दिलासा

 

१९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १३५ रुपयांनी कमी झाली आहे. परंतु १४.२ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत मात्र कुठलीच कपात झालेली नाही. कमर्शियल सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने व्यवसायिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

१ जून रोजी झालेल्या बदलानंतर दिल्लीत १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरचे दर कमी होत २,२१९ रुपये झाला आहे. यापूर्वी हा सिलेंडर २,३५४ रुपयांमध्ये मिळत होता. अशाचप्रकारे कमर्शिअल सिलिंडरचा दर कोलकत्यात २,४५४ रुपयांच्या जागी २,३२२ रुपये झाला आहे. मुंबईत आता याची किंमत २,३०६ रुपयांच्या जागी कमी होऊन २,१७१ रुपयांवर आली आहे.

यापूर्वी‌ १९ मे रोजी घरगुती वापराच्या आणि कमर्शियल सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. एकाच महिन्यात सिलिंडरच्या किमती दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली होती. तर १ मे रोजी १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरची किंमत १०२ रुपयांनी वाढली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − three =