You are currently viewing २० व २१ जुलैला माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

२० व २१ जुलैला माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सिंधुदुर्ग :

सध्या आपल्या सर्वांच्या जीवनात ताण-तणाव स्पर्धा न टाळता येण्यासारखी झाले आहेत. याचा परिणाम म्हणून *हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, स्ट्रेस, ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, संधीवात* असे अनेक आजार वाढलेले आपल्याला दिसून येतात. यासाठी माधवबाग संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या तपासणी अंतर्गत इ.सी.जी, ब्लड शुगर,हार्ट रेट, ब्लड प्रेशर वैद्यकीय व आहाराविषयी सल्ला तपासण्या गरजेनुसार मोफत करण्यात येणार आहे. हे शिबिर दि. 20 जुलै 2022 ते 21 जुलै 2022 वेळ स 10 ते सायं 5 वा.पर्यंत या कालावधीमध्ये शिबिर संपन्न होईल. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कणकवली – 9373183888, कुडाळ – 9011328581, सावंतवाडी – 7774028185 संपर्क साधावा असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा