You are currently viewing अवखळ हास्य

अवखळ हास्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर लिखित मुक्तछंद काव्यरचना*

*अवखळ हास्य*

तुझ्या अवखळ हास्यासारखे
सखे, ही वही सुद्धा हसते..
पाने फडफडतात..
वाऱ्या संगे बोलतात..
तू सुद्धा हरवून जातेस मग वाऱ्याच्या नादात…
जशी हरवतेस माझ्यात….!

खिडकीतून येणारं रवीचं तेज
तुझ्या चेहऱ्यावरील तेजापुढे फिकं पडतं…
न्याहाळत रहावासा वाटतो तेव्हा…
तुझा गोड गुलाबी तेजस्वी चेहरा
तुझ्या बदामी डोळ्यात माझंच प्रतिबिंब पाहतो…
तुझ्याशी हसताना तुझ्याच नजरेत खोलवर बसलेलं…!

पाचूच्या रंगाचा तुझा पेहराव..
गोऱ्या वर्णावर उठून दिसतो
कुंतलांवर रुळलेली सोनेरी किरणे..
मोहून टाकतात मनाला..
मजवर रोखलेली मादक नजर..
घायाळ करते हृदयाला…
गुलाब पंखुडी सारख्या खुललेल्या अधर पाकळ्या…
आकर्षून घेतात मला तुझ्याकडे..
मी माझाच न राहतो त्या क्षणाला…!

एकच इच्छा मनात आता
दुमडलेल्या या वहितील पानांमध्ये..
उतरलेलं माझं मन तू वाचावं…
मनातल्या सुप्त इच्छा…
रेखाटल्या मी कागदावर…
ते माझं निर्मळ मन तू एकदा जाणावं..
अन् जीवनाच्या प्रत्येक श्वासाची…
तू कायम सोबत व्हावंसं…!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − four =