You are currently viewing ।।आई।।

।।आई।।

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार अरुण गांगल यांची मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणारी अप्रतिम काव्यरचना

आई कसे मी विसरू बहुमूल्य ऋण
कितीही जन्म घेतले तरीही अपूर्ण।।ध्रु।।

वात्सल्याचा उमाळा सृजन हृदयांत
काळीज तुटे व्यथा राहतसे मनांत
पोरकाच मी जगतो आहे तुझ्या वीण।।1।।

आई सारखे दैवत नाही जगतात
वाढवी सांभाळी सतत काळजी घेत
आई,देवांना वंदन धरावे चरण।।2।।

आई परमेश्वर मुलाचे पाही हित
कधीही संकटात”आई” येत मुखात
वृक्षासम सावली करीते अर्पण।।3।।

नऊ मास सांभाळून ठेवी उदरात
लेक मोठा होईल पाही स्वप्न उरात
ममते पोटी जीवन टाकी ओवाळुन।।4।।

संस्कार सुगूण दाविलेस प्रपंचात
सर्व काळी तव आशीर्वाद साथ देत
विधात्याच लाभले निर्मळ कृपादान।।5।।

पुत्राचे भल्यासाठी कष्ट करी सतत
निष्काम आदर्श प्रेम दिले सदोदित
मुलाची भाषा हृदगत आईच जाण
।।6।।

गुरुत्वाकर्षण खालून वर नेईत
बिजांडातून घेऊन जात ब्रह्मांडात
आईचा देव पणा येईच समजून।।7।।

लक्ष पिलापाशी घार आकाशी फिरत
पुत्राचे अपराध माता न करी खेद
आई देवा पुढील रांगोळी निरांजन।।8।।

आई सूर्य तेज अंध:कार मिटवीत
गंगेसम पवित्र चिंतितसे उचित
स्वामी तीन जगाचा अनाथ आई वीण।।9।।

काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत, रायगड.
पिन. 410 201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा