You are currently viewing करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

वैभववाडी :

 

करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गे वळविण्यात आली आहे. गेले चार काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला. घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे.

आज सायंकाळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. घाट मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे व भुईबावडा मार्गे वळविण्यात आली आहे. करुळ चेकपोस्ट वरुन सर्व वाहतूक मागे फिरविण्यात आली आहे. तर गगनबावडा येथे अवजड वाहने थांबवण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा