You are currently viewing ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मार्फत आरोग्य विभागाला मदत ; गावातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेला थर्मल गन व ऑक्सिमिटर प्रदान

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मार्फत आरोग्य विभागाला मदत ; गावातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेला थर्मल गन व ऑक्सिमिटर प्रदान

वैभववाडी

गावातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सडुरे शिराळे मार्फत गावातील कंटेंटमेंट झोन सहीत संपूर्ण गावामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात येत असून, गावात आरोग्य विभागाचे पथक गावातील एकंदरीत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संपूर्ण गावामध्ये घर टू घर आरोग्य तपासणी सर्वे होणार आहे. सर्वे करणाऱ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सडूरे यांना प्रत्येकी एक एक ग्रामपंचायत मार्फत थर्मल गन व ऑक्सिमिटर देण्यात आले. यावेळी गावचे सरपंच संतोष पाटील, ग्रा. प. सदस्य नवलराज काळे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, डॉ. प्रियंका बंडगर, सविता कदम आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − ten =