You are currently viewing काॅलरा पटकी

काॅलरा पटकी

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

अतिशय भयानक आणि जीवघेणा जलजन्य आजार आहे . आपली जुनी लोक सांगत असतात की आपल्या भारतात पटकी सारख्या महाभयंकर महामारी आजाराने थैमान घातले होते. गावच्या गाव या आजाराने गाटली होती . एकाला जाळून आल की दुसरं मरायचे असं सर्व गावाच्या गाव संपायची त्यावेळी असा वैद्यकीय डॉ नर्स असा लवाजमा नव्हता. औषध नाही. गावठी औषधाने यांवर उपचार नाही
आज सर्वत्र औद्योगिक एम आय डी सी. विविध कारखाने यामधून बाहेर पडणारे केमिकल यामुळे होणारें वायुप्रदूषण यामुळे आज दमा . कॅन्सर. उच्च रक्तदाब. ब्रेनटुमर . असे विविध आजार होतात यामुळे आज जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे . एम आय डी सी. साखर कारखाने. व विविध केमिकल कंपन्या यामधून दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाते. आणि याच नदीपात्रातील पाणी वाड्या वस्त्या गाव गल्ली. शहरं. तालुका. याठिकाणी जलकुंभात सोडले जाते.आणि हेच पाणी नळाद्वारे पिण्यास सोडलं जातं आणि आणि नदीत सोडण्यात आलेले दुषित पाणी लोकांच्या पिण्यात आल्यामुळे विविध जलजन्य आजार होतात . काविळ. अतिसार. हिवताप. काॅलरा. असे अनेक जीवघेणं आजार होतात वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास पेशंट दगावण्याची दाट शक्यता असते . आपणच आपलं जीवन धोक्यात घालतो कारणं आपल्या गावांची शहरांची तालुका जिल्हा यांची आज भयानक वाढलेली लोकसंख्या यामुळे लोकांच्या राहण्याचा राहणे . घरातील सांडपाणी. संडासात वापरले जाणारे पाणी. मोकळी गटारे यातून येणारी दुर्गंधी. कचरयाचे डोंगरासारखे ढीग त्यातून येणारी दुर्गंधी. अशी माध्यम आहेत की त्यापासून सर्व वातावरण आपणच दुषित करत असतो .
‌‌रोग विरहित आनंद निरोगी जीवन जगायचे असल्यास आजच आपण आपल्या घरापासून सुरुवात करण्याची गरज आहे . आपल घर घरांचा परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे. आणि मग आपली गल्ली स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांचे जनजागृती करणे गरजेचे आहे . आपल्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांना वेळोवेळी आपल्या गल्लीत डास रोधक. रोग प्रसार रोधक. औषध फवारणी करण्यासाठी आग्रह करणे गरजेचे आहे. आपल्या गल्लीत असणारे मोकळे भूखंड त्यावर वाढवणारी झाड झुडपे. त्यातील पाणी साठणारे डबकी ‌यासाठी सदर जागा मालकांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी नोटीस बजावून जागा स्वच्छ करण्याचा आदेश देणे गरजेचे आहे .
कॉलऱ्यावर प्रतिबंधक उपाय व उपचार इतके सोपे असूनही, जगभरातील ४७ गरीब देशांमध्ये मिळून आजही वर्षभरात जवळपास ३० लाख लोकांना कॉलरा होतो. तर १ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हे प्रमाण दरवर्षी साधारण ३० हजार इतके आहे.
कॉलरा हा पूर्णपणे टाळता येणारा आजार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था यासाठीची पायाभूत व्यवस्था जगभरातील सर्व देशांमध्ये उभारली पाहिजे. आजही भारतात ५० टक्क्यांपेक्षा कमी घरांमध्ये स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहे. खूप लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विकसित देशांसारखे संपूर्ण कॉलरा नियंत्रण शक्य होत नाही.
आज जगभरातील जवळजवळ ९० टक्के वैद्यकीय संशोधन, हे विकसित देशांच्या प्रथमिकतेनुसार होत आहे. तर संख्येने जास्त असणाऱ्या गरीब देशांच्या गरजांवर फक्त १० टक्के संशोधन होत आहे. यासाठी जागतिक स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. तरच ‘सर्वांसाठी आरोग्य’, हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकू. अन्यथा ‘कोव्हीड-१९’ सारखेच वेगवेगळे आजार गरीब देशातून आले तरी संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण करतील आणि कॉलऱ्यासारखे शतकानुशतके रेंगाळत राहतील
भारतात १९७०-१९९० या काळात पोलिओची साथ आली. देशातील शहरी व ग्रामीण भागात आणि उत्तर प्रदेशात पोलिओग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक होते. विसाव्या शतकात १९७४ मध्ये देवीच्या साथीने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भारतात ८५ टक्के लागण झाली होती. पश्‍चिम बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमधील गावांत याचा प्रभाव मोठा होता. यातील मृतांची संख्या १५ हजार होती. ज्यांना लागण होऊनही बचावले त्यांना अंधत्व व अन्य व्यंग आले.एकविसावे शतक… उत्तर भारतातील प्लेग (२००२) उत्तर भारतात ही साथ आली. हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात याचा प्रभाव जास्त असला तरी ती लवकर आटोक्यात आली.डेंगी (२००३) सप्टेंबर २००३ मध्ये ही साथ आली. सुरुवातीला दिल्लीत तिचा प्रभाव होता. नंतर ती अन्यत्र पसरली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डेंगीचा प्रसार मोठा होता. यातील मृत्यूदर हा तीन टक्के होता. मात्र अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजूनही याचे गांभीर्य मोठे होते
पटकी (महामारी अथवा कॉलरा) हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलऱ्याची लागण होते. कॉलऱ्याचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो.
पटकी (कॉलरा) हा आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. स्वल्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलऱ्याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात कॉलऱ्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. व्यापारी मार्गाने जमिनीवरून जलमार्गाने कॉलरा इ.स. १८१७ च्या सुमारास रशियात व रशियामधून युरोपमार्गे उत्तर अमेरिकेमध्ये पसरला. जगात गेल्या दोनशे वर्षामध्ये सातवेळा कॉलऱ्याची साथ आली आहे. 1१९६१मधील इंडोनेशियातील साथ ही सातवी होती.
कॉलरा टाळण्यासाठी घरगुती उपाय: या घरगुती उपायांचे अनुसरण करा आणि कॉलरा टाळा
कॉलरा झाल्यास आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन मधासोबत बारीक करून दिवसातून तीन वेळा सेवन करा. याचा फायदा होईल.
अर्धा ग्लास पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. त्यात मीठ घाला. कॉलराच्या रुग्णाला दिवसातून अनेक वेळा दिल्यास फायदा होईल.
प्रथम हळद पाण्यात भिजवा, नंतर उन्हात वाळवा आणि पावडर बनवा. एक कप गरम पाण्यात मध आणि हळद मिसळून प्यायल्यास फायदा होईल. कॉलरा रुग्णाला स्वच्छ आणि स्वच्छ अन्न द्या. पाणी उकळून प्यायल्यानेही या आजारापासून आराम मिळतो.
घरच्या घरी ORS द्रावण तयार करा. यासाठी चार कप पाण्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळा. हे द्रावण दिवसातून अनेक वेळा प्या.
द्रवपदार्थाचे सेवन अधिकाधिक करा. कॉलरा रुग्णांसाठीही ताक फायदेशीर आहे.
दही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कॉलराच्या रुग्णाला केळी दह्यात मिसळून दिल्यास फायदा होईल.
लवंग पाण्यात उकळून रुग्णाला दिवसातून अनेक वेळा प्या.
कॉलरा किंवा कॉलराच्या रुग्णांभोवती स्वच्छतेची खूप काळजी घ्या. त्यांना उघड्यावर शौचास जाऊ देऊ नका. घरगुती उपचारांसह तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.
कॉलरा हा आजार व्‍हीब्रीओ कॉलरा या विशिष्‍ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्‍ये पाण्‍यासारखे/भाताच्‍या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्‍यंत वेगात होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्‍वरुपात होते. आजाराचा प्रसार वेगाने होतो.
बोली भाषेतील नाव
पटकी
आजाराचे वर्णन
उलटीसह अथवा उलटीशिवाय अचानक सुरु झालेले जुलाब
आजारावर परिणाम करणारे घटक
व्‍हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतडयाला संसर्ग झाल्‍याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयामधील स्‍ञी पुरुषांमध्‍ये आढळतो. रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिसारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.
रोगप्रसार
रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिस्सारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.
रोगलक्ष्‍णे
पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते ५ दिवस असा आहे. पटकी रुग्‍णात खालील लक्षणे आढळतात
पाण्‍यासारखे/तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाब
उलटया
हदयाचे ठोके वाढणे
तोंडाला कोरड पडणे
तहान लागणे
स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे
अस्‍वस्‍थ वाटणे
उपचार
जुलाब-वांत्‍या चालू आहेत पण जलशुष्‍कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्‍यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास – क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी.
तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजिकच्‍या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे.
झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्‍याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते.
जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिज्यविकांची (अॅन्टीकबायोटिक्स्ची) योग्‍य माञा (डोस) देण्‍यात यावी.
प्रतिबंधात्‍मक उपाय
शुध्‍द पाणी पुरवठा
वैयक्तिक स्‍वच्‍छता
हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत –
खाण्‍यापूर्वी व स्‍वयंपाकापूर्वी
बाळाला भरविण्‍यापूर्वी
शैाचानंतर
बाळाची शी धुतल्‍यानंतर
जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर
साबण उपलब्‍ध नसेल तर आपण आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ करु शेकतो.
मानवी विष्‍ठेची योग्‍य विल्‍हेवाट
रुग्‍णांवर त्‍वरित उपचार
बालकाचे गोवर प्रतिबंधात्‍मक लसिकरण अतिसाराच्‍या
नियंञणासाठी आवश्‍यक आहे.
आपण आत्ताच कोरोना सारख्या महामारी संकटाने पछाडलो होतो . त्यावेळी आपल्याला काय त्रास झाला आपणं तो अनुभवला आहे. आत्ता पाऊसाळा सुरू झाला सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे जागोजागी डबकी साटली आहेत. गावातील शहरातील सर्व गटारे भरुन वाहत आहेत. आणि हे सर्व घाण पाणी नदीपात्रात मिसळत आहे.आणि तेच पाणी गढुळ होऊन आपणास पिण्यास येत आहे. आजच आपण पिण्यास वापरत असणारे पाणी तुरटी. गरम करून थंड पाण्यास घ्या. डासांपासून स्वताला वाचवा. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अशा वर्कर यांना सहकार्य करा आपल आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१५ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा