You are currently viewing माझ्या जीवनातील गुरु

माझ्या जीवनातील गुरु

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ यांचा अप्रतिम लेख*……

*माझ्या जीवनातील गुरु*

*गुरुविणा नाही जीवनी अर्थ*
*साधेल कसा मग परमार्थ*….. ..
आज गुरु महिमा लिहिताना खूप आनंद होत आहे. गुरु हा ज्ञानाचा सागर तर प्रेमवात्सल्याचा न संपणारा झरा. विशाल वटवृक्षाची छाया. गुरु हा सन्मार्गाला नेणारा एकमेव सुलभ मार्ग आहे. मी पामर काय सांगू गुरूंची महती. ती अगाध आहे. आणि मी ही खरोखरच भाग्यवान आहे की मला लाखात एक सद्गुरु लाभला आहे.
गुरुपौर्णिमेला व्यास पोर्णिमा ही म्हणतात. कारण सद्गुरुंना ‘व्यास’ म्हटले जाते. गुरु पूजन हे साक्षात ईश्वराचे पूजन होय.. . देहाला देवापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरु होय…. दिव्य ज्ञानाच्या प्रखर तेजाने मृत्यूला ही चकवा देण्याची कला फक्त गुरुनांच अवगत असते.. गुरू हे ज्ञानाचे द्वार तर सन्मार्गाचा मजबूत पाया आहे..माणुस संसाराच्या दलदलीत पुर्ण अडकला आहे. मोह, माया, मत्सर ही त्याची कारणे आहेत. मनाला विषय- विकारांचा इतका रोग जडला आहे की लोक सन्मार्गाला जाणे विसरले आहेत. मी तर म्हणेन गुरु हा भाग्यानेच मिळतो. ज्यांना गुरु मंत्र मिळाला आहे ते तर भाग्यवानच. रोज नित्य नियमाने गुरु मंत्राचा जप करा. ओम् चे गुंजन करा. चित्ताची विश्रांती सामर्थ्याला प्रगट करील. दुःख रोग दूर पळतील. रोज प्रत्येकाने प्राणायाम केला पाहिजे. तसेच डोळे बंद करून ध्यानाने मनःशांती मिळते. आणि अशा निस्सिम शांतीतच खरे सुख अनुभवता येते…
आपण सद्गुरूंची योग्य प्रकारे सेवा केली पाहिजे. ते आपल्याला भवसागरातून पार करतात. त्यांचे मोठे उपकार आहेत. संत महात्मे हे सेवेचाच महिमा सांगत नाही तर जीवन उन्नत करण्यासाठी आचरणातून आपल्याला समजावूनही सांगतात. माणूस जन्माचे सोने करता आले त्यासाठी सद् भाव आणि सन्मार्गाने गेले पाहिजे.गुरु श्रद्धा ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. यामुळे अंतःकरण शुद्ध व पवित्र होते.
सद्गुरूंची अल्पकाळही पण निष्ठापूर्वक केलेली सेवा खूप काही मिळवून देते. व धन्यता वाटते. गुरु कृपेला मोल नाही. ती नशिबानेच मिळते. गुरुंना आपण मंत्र जपाने, सेवेने आणि सत्कार्याने प्रसन्न करू शकतो. ज्यांच्या नशिबी सद्गुरु नाहीत ते खरोखरच दुर्दैवी आहेत. सत्संग म्हणजे सत्यस्वरूप परमात्म्यात विश्रांती. सत्संग मिळालेला माणूस कधीही कुसंगत करणार नाही. जसा चंदनाचा बोटाला गंध राहतो तसा. त्याला अहंकाराचा वारा लागत नाही. तो अडलेल्याच्या मदतीला धावून जातो. सत्संगतीने तुमच्या 21– 21 पिढ्या कृतार्थ होतात. अवघा अर्धा तासाचा सत्संग तुम्हाला हजारो यज्ञाचे फळ मिळवून देतो. सत्संग हा माणसाच्या उद्धाराचा सेतू आहे. म्हणून गुरु आवश्य करा. त्यांना शरण जा. त्यांच्या नित सान्निध्यात राहा. येणा-या प्रत्येक गुरूपौर्णिमेला सद्गभाव व सचोटीने मनापासून त्यांचे पूजन करा. दुर्गुणांची आहुती देवून निर्मळ मनाची गंगा सदा वाहू देत. परोपकारात धन्यता माना.
गुरूविणा जगी कोण आहे त्राता
तूच ऐकणारी हाक आमुची आता..
गुरुंमुळेच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व अज्ञानाची निवृत्ती होते. जे गुरूंचा मनापासून धावा करतात तेंव्हा गुरू शिष्यासाठी भक्कम पाठी उभा असतो. ज्यांनी गुरूमंत्र घेतला आहे त्यांना हा अनुभव आहेच. यात शंका नाही. जसा मला आहे.
कसा अगाध गुरू महिमा आहे हा! असे धन्य ते सद्गुरु आणि धन्य आहेत गुरूकृपा लाभलेले ते शिष्य…..
अशा माझ्या गुरु माऊलीच्या चरणी ही शब्द फुलांची ओंजळ मनोभावे अर्पिते……

*माझ्या गुरूंचे चरणस्पर्शी जल*
*जणू त्रैलोक्याची सकल तिर्थेच होत*” …..

*लेखिका*.. *पुष्पा सदाकाळ भोसरी. पुणे*.
*9011659747*.
Pushpasadakal123 @gmail. Com

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 2 =