You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसा निमित्ताने जनता विद्यालय तळवडे येथे शालोपयोगी वस्तूंचे वाटप

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसा निमित्ताने जनता विद्यालय तळवडे येथे शालोपयोगी वस्तूंचे वाटप

सावंतवाडी

गीतरामायण फाऊंडेशन सिंधुदुर्ग व अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण सुपूञ व माजी केंद्रीय मंत्री मा. श्री सुरेश प्रभू यांचा वाढदिवस जनता विद्यालय तलवडे येथे साजरा करण्यात आला. या दोन्ही संस्थाच्या वतीने शाळेतील गरजू मुलांना शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी ग्रामीण भागातील मुलांची शिस्त पाहून समाधान व्यक्त केले तसेच सामाजिक संस्थानी जिल्ह्यातील अशा गरजवंतानी मदतीचा हात दिला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी शाळेतील आणखीन पंधरा मुलांना स्कुल बॅग्ज देण्याचे मान्य केले.
अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चाईल्ड लाईनचे संचालक आणि गीतरामायण फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपण ज्या ज्या सामाजिक संस्थावर कार्यरत आहे त्या विविध संस्थाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू घटकांना विविध प्रकारे मदत करत असून कोराना काळातही अनेक प्रकारची मदत केल्याचे सांगितले. यापुढेही ग्रामीण भागातील शाळामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
पञकार प्रा. रूपेश पाटील यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधून आपल्या दिल्याचे सुपूञ मा. सुरेश प्रभू यांच्या यशोगाथा मुलांना सांगितल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री देसाई यांनी अशा अनेक संस्था प्रशालेच्या उपक्रमाना नेहमीच सहकार्य करत असतात. ग्रामीण भागातील शाळांच्या गरजा ओळखून यापुढेही मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच शाळेतील उपक्रमशील सह शिक्षिका सौ. सुस्मिता चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा कार्यक्रम संपन्न झाला याचा विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाला गीतरामायण फाऊंडेशनचे खजिनदार श्री प्रकाश दळवी, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते श्री रविद्र पडते, चाईल्ड लाईनच्या समन्वयक कु. पुनम पार्सेकर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बांगर, महिला समुपदेशनाच्या समुपदेशक सौ. नमिता परब, टिम मेंबर श्रीमती प्रज्ञा जाधव, श्री विश्वनाथ सनाम, शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. आभार सौ. सुस्मिता चव्हाण यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 7 =