You are currently viewing श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराजांचा १९ वा चातुर्मास व्रत सोहळा कणकवलीत

श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराजांचा १९ वा चातुर्मास व्रत सोहळा कणकवलीत

कणकवली

श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी महाराज यांचा १९ वा चातुर्मास व्रत सोहळा कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्वामीजींचे आगमन ११ जुलैला सायंकाळी ४ वाजता बांदा येथे होणार आहे . तिथे स्वामीजींचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा बांधवांच्या वतीने करण्यात येईल, त्यानंतर रॅलीने स्वामीजींचे आगमन कणकवली येथे चातुर्मास स्थळी होणार आहे. सर्वांनी फोर व्हीलर गाडी घेऊन रॅलीत सहभागी व्हावे, ज्यांना बांदा येथे येणे शक्य आहे त्यांनी बांदा येथे यावे, ज्यांना वाटेत रॅलित सहभागी व्हायचे आहे त्यांनी तसे कळवावे.इतरांनी कणकवली येथे वागदे गणपती मंदिर येथे फोर व्हीलर घेऊन सायंकाळी ४ -30 वाजता उपस्थित रहावे . चला स्वामीजींच्या स्वागताच्या निमित्ताने आपल्या वैश्य समाजाची एकजूट दाखवूया . वज्रमूठ दाखवूया . जे समाज बांधव या रॅलीत सहभागी होवू इच्छितात त्यांनी आपली नावे श्रीकृष्ण नानचे -9421148853 आणि श्री उमेश वाळके 9420209600या what’s app number वर अथवा कॉलने दि . १ जुले २ ० २ २ पूर्वी कळवावी . असे आवाहन चातुर्मास सेवा समिती सिंधुदूर्ग यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा