You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा..

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा..

सिंधुदुर्गनगरी :

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 11 व 12 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4.30 वा. वाघोटण, ता. देवगड गावास भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. देवगड येथून मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण, सायं. 7.00 वा. पोलीस मुख्यालय, शासकीय विश्रामगृग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सवमेत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व कोरोना आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक, दुपारी 12.00 वा. डी.पी.डी,सीच्या नुतन सभागृहात जनता दरबार, दुपारी 2.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता, कुडाळ एम.आय.डी.सी. व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा कामगार कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत सुरक्षा रक्षकांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी 2.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा, दुपारी 2.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, प्रादेशिक अधिकारी, एम.टी.डी.सी. प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता महावितरण, पर्यटन व्यवसायिक प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक यांच्या समवेत चर्चा, दुपारी 3.00 ते 4.00 राखीव, दुपारी 4.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायं. 5.00 वा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ओरोस येथे अभ्यागतांच्या भेटी, सायं. 5.30 नंतर सोईनुसार ओरोस सिंधुदुर्ग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 16 =