You are currently viewing फुलपाखरू पर्यटकांना आकर्षित करत असल्याने फुलपाखरू उद्यान होणे गरजेचे – हेमंत ओगले

फुलपाखरू पर्यटकांना आकर्षित करत असल्याने फुलपाखरू उद्यान होणे गरजेचे – हेमंत ओगले

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आढळून येतात. मात्र त्यांच्या संवर्धनासाठी शासन पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. फुलपाखरू हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरत असल्याने फुलपाखरू उद्यान होणे गरजेचे असल्याचे मत फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले यांनी बोलताना व्यक्त केले

वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडीच्या वतीने “सिंधुदुर्गातील फुलपाखरे” या विषयावर ऑनलाईन वेबिनार मध्ये हेमंत ओगले यांनी मांडणी केली.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आहेत. आंबोली आणि पारपोली भागात २१८ प्रजातीची फुलपाखरू आढळतात तसेच तिलारी पट्ट्यात देखील फुलपाखरांचे प्रमाण जास्त आहे. सागरी किनारपट्टी, तळकोकणात फुलपाखरांची संख्या जास्त असली तरी त्यांची गणना आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर कोणताही प्रकल्प नसल्याचे हेमंत ओगले यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवसृष्टी सोबत वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे, वनसंपदा अधीक आहे, त्या भागांमध्ये फुलपाखरांचे प्रमाण जास्त आढळून येते असे ते म्हणाले. फुलपाखरांचे वनस्पती हे खाद्य आहे झाडावरची पाने खाऊन ते अळी वाढवतात, त्यासाठी वनस्पती संवर्धन व्हायला हव्यात. फुलपाखरू, अळी व खाद्य हे फुलपाखरू संवर्धनासाठी फारच महत्त्वाचे आहे असे हेमंत ओगले म्हणाले.

जगभरामध्ये १८ हजार तर भारतामध्ये १३२० प्रजातीची फुलपाखरू आढळून येतात. पश्चिम घाटात गुजरात तापी नदी ते ते कन्याकुमारी पर्यंत ३३६ ते ३४० प्रजाती फुल फुलपाखरू आढळतात. सिक्कीम सारख्या एका प्रदेशांमध्ये सातशे ते आठशे प्रजातीची फुलपाखरू आढळतात कारण तेथे वनसंपदा, संवर्धन अधिक आहे, एव्हरग्रीन फुलपाखरांसाठी सौंदर्य आहे असे हेमंत ओगले म्हणाले.

पश्चिम घाटाचे संरक्षण करताना संवर्धन देखील व्हायला हवे. महाराष्ट्र राज्यामध्ये फुलपाखरांच्या प्रजातीची गणना झालेली नाही तरीही २२५ ते २४० प्रजाती आहेत. मात्र गुजरातमध्ये १७९, केरळ ३२९, कर्नाटक ३२५, गोव्या २५४ ते २५७, तामिळनाडू ३२७ प्रजातीची फुलपाखरू आढळून येतात असे हेमंत ओगले यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फुलपाखरू संवर्धन राखीव प्रकल्प झाले तर पर्यटकांचे पाय फुलपाखरू उद्यानाकडे वळतील आणि त्यामुळे रोजगाराचे साधन देखील निर्माण होईल मात्र फुलपाखरू उद्यान किंवा फुलपाखरांच्या प्रजातीसाठी लक्ष देण्याची गरज आहे शासनाने पर्यावरण आणि पर्यटन यांच्या यांची सांगड घालून फुलपाखरांचा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले तर सिंधुदुर्ग जिल्हा फुलपाखरू पर्यटन क्षेत्र अधिक जोमाने विकसित होईल असे हेमंत ओगले यांनी बोलताना सांगितले.

या वेबिनार मध्ये प्रा. धिरेंद्र होळीकर, डॉ. गणेश मर्गज, प्रा सुभाष गोवेकर, सतिश लळीत, डॉ.कीशोर सुखटणकर, महेंद्र पटेकर, शिवप्रसाद देसाई,अभिमन्यू लोंढे, तसेच मान्यवरांनी सहभाग घेतला होता

फुलपाखरू उद्यानासाठी पारपोली सारख्या ठिकाणी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातून रोजगानिर्मिती होऊ शकते. पुण्या मुंबईचे अनेक फुलपाखरू अभ्यासक व छायाचित्रकार तेथे भेट देऊन जातात, असे एक उदाहरण श्री. ओगले यांनी दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 5 =