You are currently viewing सनरायजर्स हैदराबाद ने पंजाबला ६९ रन्सने हरवलं…

सनरायजर्स हैदराबाद ने पंजाबला ६९ रन्सने हरवलं…

दुबई:

आयपीएल २०२० (IPL 2020) सीझनमधील २२वी मॅच दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाली.

हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबचा ६९ धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा पंजाबविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी गतवर्षी हैदराबादने पंजाबला ४५ धावांनी पराभूत केले होते.

सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ १३२ धावांवर गारद झाला. पंजाबकडून निकोलस पुरनने एकहाती संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. निकोलसने ७७ धावा केल्या. तर हैदराबादच्या राशिद खानने ४ षटकांत १२ बाद ३ गडी बाद केले.

या विजयामुळे सनरायजर्स हैदराबादची टीम आयपीएल २०२०च्या पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंत सहा मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीन मॅचेसमध्ये विजय मिळवत आपल्या खात्यात सहा पॉईंट्स जमा केले आहेत. आता सहा पॉईंट्ससह सनरायजर्स हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर किंग्स इलेव्हन पंजाब शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =