You are currently viewing तुला पाहतो मी…

तुला पाहतो मी…

लेखक कवी प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांची अप्रतिम काव्यरचना

तुला पाहतो मी…
नित्य हासताना
अन् मनातल्या
अव्यक्त भावनांना
अश्रूत कोंडताना…!

तुला पाहतो मी…
नित्य बहरतांना
अन् मौनातल्या व्यथांना
सहाही ऋतूंच्या
हवाली करताना…

तुला पाहतो मी…
आसावरी गाताना
अन् डोळ्यांतल्या
मेघमल्हाराला…
लिलया ढगांशी
मैत्र जोडतानां…

तुला ऐकतो मी…
नित्य स्वप्नांशी बोलताना
अन् मर्मबंधातल्या नात्यांना
सुहास्य वदनाने
गुलाबी उखाणे घालताना…!!!

तुला पाहतो मी…
नित्य मला स्पर्शताना
अन् हृदयीच्या वेदनांना
मखमली हातानी
हळूवार कुरवाळताना…!!!

प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड

मो. नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + ten =