You are currently viewing वृत्त – मंदारमाला  काव्य/कविता

वृत्त – मंदारमाला काव्य/कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना*

*वृत्त – मंदारमाला*

*काव्य/कविता*

शब्दांवरी काय आम्ही करावीच जादूगरी शब्द सोन्यापरी
शब्दांस गुंतून माळेत ओवीयले काव्य माझेच माझ्यावरी

सृष्टीत जे पाहतो ते निसर्गातले सर्व माझ्या मना आवडे
पाषाण झालीत वाटेतली माणसे शब्द त्यांनाच ते वावडे

न्याहाळतो सूर्य चंद्रास काव्यात रेखाटतो अंबाराशी जसे
शोधूनही सापडेना नभांतील चित्रांतही आज तारे असे

शब्दांस वृत्तात छंदात बांधून घेता नवे काव्य जन्मायचे
साधू महात्मे असे एक ना अनेकांत काव्य जाणायचे

पक्षी फुले झाड वेली नदी सागरी लाट बेभान वाऱ्यासवे
शोधीत जातो कवी स्वर्गभूमीत सौंदर्य आनंद ज्ञानी नवे

स्वप्नातल्या सर्व घटनांत जगतो कवी जन्मतो रोज काव्यातुनी
देहातला श्वास जरि संपला काव्य रूपे असे अमर शब्दातुनी

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + one =