*उद्यापासून निरवडे येथे बैठक बसविण्याच्या हालचाली सुरू*
सावंतवाडी जवळील कोलगाव गावात गेले काही दिवस जुगाराची बैठक बसत होती. जुगाराचा हा गोंधळ घालणाऱ्या संज्याने बैठकीचे नियोजन केले होते. संवाद मीडियाला कोलगाव येथील बैठकीबाबत माहिती मिळताच संवाद मीडियाने याबाबत चॅनेलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा लक्ष वेधल्यानंतर कारवाई अखेर कोलगाव येथील बैठक बंद करण्यात आली.
कोलगावातील बैठक बंद केल्यामुळे गोंधळ घालणाऱ्या संज्याने जुगारासाठी दुसरी सुरक्षित जागा म्हणून निरवडे येथे उद्यापासून बैठक बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज सायंकाळी बैठकीची जागा देखील निश्चित केली असून त्याची रंगीत तालीम सुद्धा घेतली आहे. उद्या खेळाडूंना कॉल करून बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण देखील दिलेले आहे.
सावंतवाडी रेल्वे स्टेशन शेजारील निरवडे हे गाव जिल्हा पातळीवर स्वच्छ सुंदर गाव म्हणून बक्षीस प्राप्त गाव आहे. राज्य पातळीवर स्पर्धेत असणाऱ्या गावात जुगाराच्या बैठका बसविण्याचे सुरू असलेले मनसुबे ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उधळून लावून अवैद्य धंद्यांना गावात थारा देऊ नये. पोलीस अधीक्षकांनी देखील याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.