वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणूक प्रभारी पदी जयेंद्र रावराणे यांची निवड.

वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणूक प्रभारी पदी जयेंद्र रावराणे यांची निवड.

माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांनी श्री. रावराणे यांना दिल्या शुभेच्छा.

वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या निवडणूक प्रभारी पदी भाजपा नेते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

वाभवे – वैभववाडी न. पं. ची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजपा लढविणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्या खांद्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्री. रावराणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाल्यानंतर जयेंद्र रावराणे, वैभववाडीचे उपनगराध्यक्ष रोहन रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांचे आशिर्वाद घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा