You are currently viewing सैनिक स्कूल ची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

सैनिक स्कूल ची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

कॅडेट तनुष गुरुनाथ राऊत आंबोली केंद्रात प्रथम

आंबोली

आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एस्. एस्. सी म्हणजेच इ. १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १५ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखती असून कॅडेट तनुष गुरुनाथ राऊत ९३. ८० टक्के गुण मिळवून आंबोली केंद्रातून व शाळेतून प्रथम आला. कॅडेट नाईक गौरेश शिवानंद ८९. ६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट पांचाळ नील अरविंद ८५. ६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकांचे मानकरी ठरले. शाळेतील एकूण ३१ विद्यार्थ्यांपैकी एकूण १६ विद्यार्थी विशेष श्रेणी तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्या पर्यंत पोहोचण्यासाठी व सातत्य टिकविण्यासाठी सैनिक स्कूल अँड जुनियर कॉलेजने विशेष उपक्रम राबविले होते. ZOOM app वापरून online शिक्षण दिले. वर्षभरात विविध ऑनलाईन परीक्षा Google forms द्वारे घेण्यात आल्या. अध्यापन प्रक्रियेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेशही केला. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी NDA लेखी परीक्षेत तसेच JEE, CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी नेव्ही. मर्चंट नेव्ही. बहुराष्ट्रीय कंपनी आदि क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.
शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत युद्ध कौशल्य आत्मसंरक्षण विविध साहसी खेळ व स्कॉलरशिप ऑलंम्पियाड या सारख्या स्पर्धापरीक्षा यांचे मार्गदर्शन केले जाते.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री पी. एफ. डान्टस, सचिव श्री सुनिल राऊळ संचालक जॉय डान्टस. कार्यालयीन सचिव श्री दीपक राऊळ सर्व संचालक मंडळ व प्राचार्य नितीन गावडे. पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

प्रतिक्रिया व्यक्त करा