You are currently viewing शेवंता पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला….

शेवंता पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला….

मुंबई:

प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला ‘शेवंता’ पुन्हा येतेय; लवकरच ‘या’ मालिकेत दिसणार

रात्रीस खेळ चाले २ मधून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर  पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीनबोल्ड करायला सज्ज झाली आहे. तिची नवी भूमिकादेखील शेवंता एवढीच दमदार असल्याची माहिती मिळत आहे. रात्रीचा खेळ चाले २

त्यातलं शेवंता (Shevnta) हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. शेवंताची अदा, तिची बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना घायाळ करणारं होतं.

आता झी युवा (Zee Yuva) वाहिनीवरील नव्या मालिकेमध्ये अपूर्वा झळकणार असल्याची माहिती मिळते आहे.

तिच्या येणाऱ्या सीरिअलमध्ये अपूर्वाची भूमिका तितकीच दमदार आणि ग्लॅमरस आहे.

शेवंताच्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेला ठसका तिला आत्मसात करावा लागला होता. अपूर्वा आता पम्मीच्या भूमिकेत कोणत्या रुपात दिसणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 16 =