You are currently viewing संवाद मिडियाच्या बातमी नंतर बांदा पंचक्रोशीतील जुगारांवर पोलीस अधिक्षकांची टाच

संवाद मिडियाच्या बातमी नंतर बांदा पंचक्रोशीतील जुगारांवर पोलीस अधिक्षकांची टाच

*घोनशी जत्रेत पोलीस निरीक्षकांना अंधारात ठेवत वळसेकरचा हिरवा बावटा*

 

बांदा पोलीस दुरक्षेत्राच्या अखत्यारीत जत्रेतील जुगाराला परवानगी दिली अशी संवाद मिडीयाने बातमी दिल्यानंतर सावधगिरी बाळगत काही ठिकाणी जत्रेत उशिरा जुगाराला सुरुवात झाली होती. संवाद मिडीयाला जुगाराच्या बैठकी बसल्याची खबर मिळताच संवाद मिडीयाने तात्काळ बातमी दिली. संवाद मिडियाच्या बातमीची जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दखल घेत जत्रोत्सवात सुरू असलेले जुगार बंद करण्याचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षकांनी जत्रोत्सवात बसणाऱ्या जुगारांवर टाच आणल्यावर स्थानिक पोलीस जुगाराला परवानगी देत नाहीत. आज बांदा पंचक्रोशीत चार गावांमध्ये जत्रोत्सव असून कोन तरी घोनशी नावाच्या गावात जुगाराची मैफिल बसविण्याची जय्यत तयारी झाली असून बांदा पोलीस निरीक्षकांना अंधारात ठेवत वळसेकर नामक एकाने रात्री ११.०० नंतर बैठक बसविण्याची परवानगी दिल्याची खात्रीशीर बातमी आली आहे. परंतु परवानगी देताना स्वतःचग जबाबदारीवर बैठक बसवा असे सांगत वरिष्ठांचे आदेश आल्यावर जुगाराच्या मैफिली बंद कराव्या लागणार अशीही तंबी देण्यात आली.

संवाद मिडियाच्या बातमीचा धसका घेत बांदा दुरक्षेत्रातील पोलिसांनी देखील जत्रोत्सवात बसणाऱ्या जुगारांच्या बाबत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. बांदा परिसरातील घोनशी जत्रेत बसणारा जुगार देखील बंद होईल अशी नक्कीच आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =