You are currently viewing पणदूर तिठ्यानजीक अपघात, दोन्ही कारचे नुकसान

पणदूर तिठ्यानजीक अपघात, दोन्ही कारचे नुकसान

कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पणदूर तिठ्यानजीक ओरोसच्या दिशेने येणारे कार आणि पणदूर सर्व्हिस रोडवरून येणारी कार यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही कारचे मोठं नुकसान झाले असून एक कार बाजूच्या टी-स्टॉलमध्ये घुसली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ओरोसवरून भरधाव येणाऱ्या कारला पणदूर सर्व्हिस रोडवरून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा