देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट

 

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १६७ रुग्ण दगावले आहेत. तर १२ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तसेच आणखी चांगली बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १८,३८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान आतापर्यंत १ कोटी ४ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १२,५८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात १६७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा