You are currently viewing पत्रकारांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मे रोजी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पत्रकारांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मे रोजी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकारांच्या वतीने मंगळवारी 17 मे ला राज्यभर त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने छेडण्यात येणार आहे. या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे राज्य शासनाने मागण्यांची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी लेखी मागणी
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,सचिव उमेश तोरस्कर यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सुमारे 83 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असले नी आघाडीची पत्रकार संघटना आहे माननीय प्र. के. अत्रे, पु. रा. बेहरे, ना.सी. फडके ह.रा. महाजनी, य. कृ. खाडिलकर अशा महनीय पत्रकार साहित्यिकांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
गेली वीस वर्षे परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख, विश्वस्त श्री. किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या हितासाठी परिषद कार्यरत आहे. पत्रकार हक्क संरक्षण कायदा पत्रकारांना सन्मान (पेन्शन) योजना आदी मागण्यांसाठी परिषदेने आंदोलने करून लढे उभारले. पर्यायाने शासनाने पत्रकार हक्क संरक्षण कायदा केला देशातील महाराष्ट्र हे असा कायदा करणारे पहिले राज्य आहे परंतु दुर्दैवाने त्याची कटाक्षाने अंमलबजावणी होताना दिसत नाही पत्रकारांवर हल्ला झाल्यावर या नव्या कायद्यानुसार गुन्हेगारांवर गुन्हे नोंदवून कारवाई व्हावी तसेच जेष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या प्रस्तावात अवास्तव त्रुटी काढून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव नाकारले जात आहे. माहिती उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या शिफारशी असतानाही त्या अमान्य केल्या जातात याबाबत चौकशी होऊन ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाने बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना मंजूर करण्यात यावी गेल्या काही वर्षात शासनातर्फे पत्रकारांना देण्यात येणारे पुरस्कार पारितोषिके बंद करण्यात आली आहेत. ती पुन्हा चालू करावी, पत्रकारांच्या अधिस्वीकृती मिळण्यातील जाचक अटी रद्द कराव्यात. मुंबई-गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे, कोरोना काळात जे पत्रकार मृत्युमुखी पडले त्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर करून त्यांना किमान दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.पत्रकारांवर पुन्हा एकदा हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे वृत्त संकलनासाठी गेलेल्या श्री विनायक गांवस या पत्रकारावर पोलिसांनी आकसाने गुन्हा दाखल केला आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व सावंतवाडी पत्रकार समितीतर्फे निवेदने देण्यात आली आहेत. त्याची दखल घेऊन आकसाने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा. पत्रकार आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे. व इतर मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी परिषदेला भेटीची वेळ द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आली आहे. तरी या धरणे आंदोलनात जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार समिती सदस्यानी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − three =