ठेकेदार राजू राणे यांचे उपचारा दरम्यान निधन

ठेकेदार राजू राणे यांचे उपचारा दरम्यान निधन

अपघातानंतर गोवा बांबुळी येथ होते उपचार सुरु

सावंतवाडी

माडखोल धवडकी येथे २९ डिसेंबर रोजी दत्तजयंती दिवशी गाडीने ठोकर दिल्याने गंभीर जखमी झालेले ठेकेदार राजू राणे यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले तेवीस दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली.
व्यवसायाने ठेकेदार असलेले राजू राणे हे मूळ माडखोल येथील असून ते सर्वोदयनगर येथे वास्तव्यास होते. दतजयंती दिवशी माडखोल धवडकी येथील दत्त मंदिरात ते दर्शनासाठी गेले होते. तेथे दर्शन घेऊन आपल्या गाडीकडे परतत असताना आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव गाडीची धडक त्यांना बसल्याने ते जागीच कोसळले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर गोवा बांबुळी येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सावंतवाडीत शहरात शोककळा पसरली आहे. व्यवसायाने ठेकेदार असलेले राजू राणे हे मूळ माडखोल येथील होते. तर ते सध्या सर्वोदयनगर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, आई, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. सावंतवाडी एसटी आगाराचे सेवा निवृत्त अधिकारी आनंद राणे, सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव संतोष राणे तसेच संजय राणे यांचे ते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा