You are currently viewing जिल्हा पत्रकार  संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शुभेच्छा

जिल्हा पत्रकार  संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शुभेच्छा

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्यचा अंक देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

                जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी उमेश तोरसकर, उपाध्यक्षपदी बाळ खडपकर, रमेश जोगळे, विद्याधर तथा बंडी केनवडेकर, संतोष सावंत, सह कार्यवाह पदी महेश रावराणे, कार्यकारिणी सदस्य म्हणून संतोष राऊळ, महेश सरनाईक, राजन नाईक, हरिश्चंद्र पवार, दीपेश परब, राजेंद्र मुंबरकर, लखु खरवत, प्रकाश काळे या पदाधिकाऱ्याची बिनविरोध निवड झाली.

                मुख्यालय पत्रकार संघाच्या कार्यालयात या बिनविरोध निवडीबद्दल जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. तोरसकर, उपाध्यक्ष श्री. खडपकर, श्री. जोगळे, सचिव श्रीमती वरसकर, तसेच मावळते अध्यक्ष गणेश जेठे यांना लोकराज्यचा अंक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव मनोज वारंग, संदीप गावडे, विनोद दळवी, रवी गावडे, नंदकुमार आयरे, गुरू दळवी, गिरीष परब आदी उपस्थित  होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 5 =