You are currently viewing ग्लेन मॅक्सवेल नामक वादळात अफगाण गोलंदाजांची शरणागती

ग्लेन मॅक्सवेल नामक वादळात अफगाण गोलंदाजांची शरणागती

*ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांत सात विकेट गमावत २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत २९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

 

अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक नाबाद १२९ धावा केल्या. राशिद खानने ३५ धावांची नाबाद खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी नाबाद २०१ धावा केल्या. मिचेल मार्शने २४ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक, अजमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

 

ऑस्ट्रेलियाने ९१ धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने पॅट कमिन्ससोबत २०२ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विश्वचषकातील हे पहिलेच द्विशतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला.

 

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला २९२ धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे. इब्राहिम झद्रानने १४३ चेंडूत १२९ धावा केल्या, तर राशिद खानने १८ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांच्यात सहाव्या विकेटसाठी २८ चेंडूत ५८ धावांची नाबाद भागीदारी झाली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात ६४ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.

 

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज २५ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. रहमत ३० धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. शाहिदी २६ धावा करून बाद झाला. अजमतुल्ला उमरझाईही २२ धावा करून तंबूमध्ये परतला. मोहम्मद नबी १२ धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. इब्राहिमने १४३ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी राशिदने १८ चेंडूत ३५ धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

२९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. ट्रॅव्हिस हेड खाते न उघडताच बाद झाला. नवीन उल हकने त्याला यष्टिरक्षक इक्रम अलीखिलकरवी झेलबाद केले. आता वॉर्नर आणि मिचेल मार्शने झटपट धावा काढून ऑस्ट्रेलियाला दमदार पुनरागमन केले, पण मार्श २४ धावा करून नवीनचा दुसरा बळी ठरला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४३ धावा होती. अजमतुल्ला उमरझाईने सलग दोन चेंडूंत विकेट घेत ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. डेव्हिड वॉर्नरने २९ चेंडूत १८ धावा केल्या. यानंतर जोश इंग्लिसला इब्राहिम झद्रानने झेलबाद केले. मात्र, षटकातील तिसरा चेंडू मॅक्सवेलच्या बॅटच्या कडेला लागला आणि त्याची हॅटट्रिक हुकली. नऊ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५१/४ होती. रहमत शाहच्या अचूक थ्रोमुळे १४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर लॅबुशेन धावबाद झाला. ७३ धावांवर पाच गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करत होता. स्टॉइनिसही सहा धावा करून बाहेर पडला. रशीद खानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. स्टार्कही तीन धावा करून बाद झाला. रशीदच्या चेंडूवर यष्टीरक्षकाने झेल घेतला. चेंडू त्याच्या बॅटला लागला नसला तरी स्टार्कने रिव्ह्यू घेतला नाही. २० षटकांत ९८ धावांत सात गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला होता. अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी शानदार भागीदारी केली. मॅक्सवेलला अनेक जीवदान मिळाली. ३३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मुजीबने अतिशय सोपा झेल सोडला. यानंतर या दोघांनी आठव्या विकेटसाठी २०२ धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. १२८ चेंडूत २०१ धावा केल्यानंतर मॅक्सवेल नाबाद राहिला. त्याने २१ चौकार आणि १० षटकार मारले. त्याचवेळी कमिन्सने ६८ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या. त्याच्या खेळीत एका चौकाराचा समावेश होता. कमिन्सच्या संयमी खेळीचे कौतुक करावे तितके कमी आहे. मॅक्सवेलला आराम मिळावा म्हणून त्याने काही षटके एकट्यानेच निर्धाव खेळून काढली.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा