You are currently viewing आरवली वेतोबा वर्धापन दिनानिमित्त आठ मेपासून विविध कार्यक्रम

आरवली वेतोबा वर्धापन दिनानिमित्त आठ मेपासून विविध कार्यक्रम

आरवली वेतोबा वर्धापन दिनानिमित्त आठ मेपासून विविध कार्यक्रम*

शिरोडा

आरवली श्री देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा रविवार १२ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे.८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा, ९ मे रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता स्वराभिषेक अभिषेक काळे (सांगली) यांची अभंग नाट्यगीत भावगीतांची सदाबहार मैफिल, १० मे रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा नाट्यप्रयोग, ११ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता कलानीलमय ढवळी फोंडा-गोवा प्रस्तुत पदन्यास भरतनाट्यम नृत्याविष्कार, १२ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम पूर्णाहुती बलिदान, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वाजता श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ आरोस प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती वि. वा. शिरवाडकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित तीनअंकी नाटक ‘नटसम्राट’ हे होणार आहेत. १३ मे रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्री रामेश्वर बाल दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, १४ मे ‘रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्रींची इच्छा नाट्यमंडळ तेंडोली प्रस्तुत वि. वा. शिरवाडकर लिखित संगीत तीन अंकी पौराणिक बोधप्रत नाट्यपुष्प ‘संगीत ययाती आणि देवयानी’, १५ मे रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, आरवली गावकर मानकरी व आरवली ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा