You are currently viewing केशव सेवा साधना संस्थेच्या स्कुल बसचा दोडामार्ग वासीयांना मिळणार लाभ

केशव सेवा साधना संस्थेच्या स्कुल बसचा दोडामार्ग वासीयांना मिळणार लाभ

नगराध्यक्ष व पालकांच्या प्रयत्नांना यश : आज पासून सेवा सुरू

दोडामार्ग

डिचोली गोवा येथील नारायण झाट्ये यांच्या केशव सेवा साधना विशेष मुलांच्या शाळेच्या बससेवेचा लाभ आता दोडामार्ग तालुक्यातील या शाळेत शिकणाऱ्या विशेष मुलांना मिळणार आहे, ही बससेवा आजपासून दोडामार्ग येथून सुरू झाली. अखेर कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या अगोदर ही बससेवा कासरपाल गोवा येथून सुरू होती त्यामुळे या विशेष मुलांना ही बससेवा लाभ मिळविण्यासाठी कासरपाल येथे जावे लागत होते, त्यामुळे या मुलांची गैरसोय होत होती अखेर ही गैरसोय दूर झाल्याने या विशेष मुलात व त्यांच्या पालकांतुन आनंद व्यक्त होत आहे, ही बससेवा शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, या संस्थेचे अध्यक्ष, पालक, नागरीक, माजी सैनिक व सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − ten =