You are currently viewing गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते उद्या तर रविवारी मा.खा. निलेश राणे यांच्या हस्ते पारितोषीक वितरण सोहळा

गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते उद्या तर रविवारी मा.खा. निलेश राणे यांच्या हस्ते पारितोषीक वितरण सोहळा

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा दि११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ओंकार डिलक्स,हॉल येथे आयोजित केली आहे.सदर कार्येक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि.११नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांचे हस्ते करणेत येणार आहे.तर पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि.१३नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ३.३० वा मा.खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.या उद्घाटन व पारितोषिक सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, सौ.नीता राणे,प्रकाश मोर्ये,तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ,प्रमोद गावडे, जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या प्रदर्शन व स्पर्धे मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १२०मूर्तीकारांनी सहभाग नोदवला असुन जिल्ह्यातील गणेश भक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पहाण्याची सुर्वण संधी लाभणार आहे.

शनिवारी १२नोव्हेंबर २०२२रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण स्पर्धा ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच१२नोव्हेबर व १३नोव्हेंबर २०२२रोजी अक्षय मेस्त्री,घोडगे सिध्देश तेली,परूळे यांना मूर्तिकाम प्रात्यक्षिकांसाठी निमंत्रित करण्यात आले असुन गणेश भक्तांना या दोन दिवशी गणेश मूर्ती घडत असतानाचे प्रात्यशिक पहाता येणार आहे. तरी कृपया या उद्घाटन व पारितोषिक सोहळ्यास जिल्ह्यातील गणेश भक्तांनी बहूसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा