हॅप्पी बर्थ डे म्हणायचं राहून गेलं, कोरोनाने वाढदिवसालाच मित्र गेला!

हॅप्पी बर्थ डे म्हणायचं राहून गेलं, कोरोनाने वाढदिवसालाच मित्र गेला!

मित्रांनी रात्री 12 वाजेनंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. पण, सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली.

 

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.  एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोनई येथे समोर आली आहे.

राजस्थानी युवा मंचाचा कार्यकर्ता ओंकारलाल भळगट (वय 33) हा अहमदनगरमधील सोनई येथे राहत असून कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. नगरमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे ओंकारला औरंगाबादमध्ये हलवण्यात आले होते. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असं वृत्त समोर आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा