You are currently viewing प्रेम गाथा

प्रेम गाथा

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम गाथा*

 

कापूर ठेवता टोकाला, क्षणातच पेटते वात

अखंड उजळते जीवन स्नेहाची मिळता साथ

 

खूण पटता निजांतरीची प्रेम जडे निमिषात

चैन पडेना जीवालाअस्वस्थता उरी अंतरात

 

मनाचा विचार होता प्रेमात नसतो व्यवहार

कठोर समाजाचे होतात कधी शब्दांचे प्रहार

 

प्रेमाची नसते काही परंपरा किंवा परिभाषा

दोन मनांना ती अडचण ठरत नसते भाषा

 

जुळली मने, मते, मैत्री लाभता दीर्घ सहवास

रोजचे जाणे येणे सर्व मोसमी एकत्र प्रवास

 

परिपूर्ण नसे कोणी ठायीअसतात गुणदोष

यावे मग फुलपाखराने बाहेर फोडूनी कोष

 

प्रेमात असते अनुसरण शरण समर्पण

नितळ निर्मळ असावा सदा समाजाचा दर्पण

 

प्रेमात नसते हक्काची निव्वळ कर्तव्य भावना

स्वच्छंद जगाया प्रेमात नसते केवळ वासना

 

प्रेमात ओलांडायचा कधी परिवाराचा परिघ

प्रेमात पार करायची संस्कारांची लक्ष्मण रेघ

 

मनस्वी वर्तनी बेसावध क्षणांची होते मग खबर

वर्तमान होता इतिहास नोंदते प्रेम गाथा, बखर

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

 

 

*संवाद मिडिया*

 

*यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो….. 🛵🏍️*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

🪄 *यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो…🛵🏍️*

 

👉 स्कुटरवर 3000 चा कॅश डिस्काउंट 🛵

 

👉 HF DLX वर 2500 चा कॅश डिस्काउंट 💸

 

👉Xtreme / Xpulse वर 5000 चा एक्सचेंज बेनिफिट 😇

 

👉 Destini Prime फक्त 89,999/- ऑन रोड

 

👉 Flipkart बुकिंग वर भरपूर सुट

 

👉 एक्सचेंज / फायनान्स उपलब्ध

 

👉 ऑफर फक्त 12 April 24 पर्यंत

 

👉 अटी लागू

 

👉 आजच बुक करा…📝

 

🎴 मुलराज हिरो कुडाळ – 9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा