You are currently viewing कुडाळ तालुक्यात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

कुडाळ तालुक्यात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी :

कुडाळ तालुक्यात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. ओरोस येथे जिल्हा परिषद कॉलनी येथे दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत, पणदूर- मयेकरवाडी, शांतीनगर येथे दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत, कुडाळ आंबेडकरनगर, कुडाळेश्वरवाडी, गिरनार हिल, एमआयडीसी, श्रीरामवाडी, उद्यमनगर येथे दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत, कुडाळ, सिटी सेंटर बिल्डिंग येथे 16 ऑक्टोबर पर्यंत, सांगिर्डेवाडी येथे 18 ऑक्टोबर पर्यंत, पडतेवाडी, पांडुरंग रेसिडेन्सी येथे 19 ऑक्टोबर पर्यंत, रानबांबुळी, पालकरवाडी येथे 14 ऑक्टोबर पर्यंत, ओरोस, देऊळवाडी येथे 15 ऑक्टोबर पर्यंत, रानबांबुळी, ख्रिश्चनवाडी येथे 16 ऑक्टोबर पर्यंत, पिंगुळी-देऊळगाववाडी, हरिजनवाडा येथे 16 ऑक्टोबर पर्यंत, नेरुर-कविलगाव, दुर्गवाड येथे 19 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 3 =