You are currently viewing सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये ३११ प्रकरणे निकाली…

सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये ३११ प्रकरणे निकाली…

सावंतवाडी

येथील तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित लोकअदालती मध्ये ३११ प्रकरणे सामजस्य व तडजोडीने निकाली काढण्यात आली. यावेळी १८ लाख ५८ हजार ७०५ रूपये वसुली करण्यात आली. यात एकूण १८८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. सावंतवाडी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर बेडगकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालत झाली. यावेळी वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. पी. डी. देसाई, पॅनेल समिती सदस्य ॲड जी. जी. बांदेकर उपस्थित होते. वादपूर्व प्रकरणे १३८६ ठेवणेत आली होती. त्यापैकी २६३ प्रकरणे निकाली होवून १० लाख ८८ हजार २५१ रूपये रक्कम वसूल झाली.
न्यायालयीन प्रलंबित ५०२l प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ४८ प्रकरणे निकाली होवून ७ लाख ७० हजार ४५४ रूपये रक्कम वसूल झाली.लोकन्यायालय यशस्वी करणेसाठी न्यायालयाचे सहा अधिक्षक, श्रीमती. एन. एस. सावंत व श्री. एस. एस. सबनीस तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपीक श्रीमती. व्ही. एम. मीर आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + eight =