You are currently viewing दोडामार्ग तालुका वर्धापदिनानिमित्त आयोजीत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दोडामार्ग तालुका वर्धापदिनानिमित्त आयोजीत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दोडामार्ग

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग, लक्ष्‍मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय,राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत रक्तगट हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात ५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ५८ पैकी २ निगेटिव्ह रक्तगट सापडले तर ५८ पैकी १४ जणांचे हिमोग्लोबिन कमतरता जाणवली.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अरुण खानोलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,दोडामार्ग अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष श्री.तुळसकर व सौ.गीतांजली सातार्डेकर, सचिव संतोष सातार्डेकर, एन.एस एस.विभागाचे प्रा.दिलीप बर्वे,प्रा.श्री.इंगळे दोडामार्ग तालुका आरोग्य विभागाचे कार्यक्रम सहाय्यक तथा प्रतिष्ठानचे संपर्कप्रमुख अजित सावंत,आरोग्य सेविका श्रुति शिरोडकर, रेशमा क्षीरसागर,रजनी बुटे, आरोग्य परिवेक्षक सदाशिव आयनोडकर,प्रतिष्ठानचे सहसचिव वैभव रेडकर,रामकृष्ण दळवी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख भूषण सावंत यांनी केले तर आभार एन.एस.एस प्रमुख दिलीप बर्वे यांनी मानले.लक्ष्मीबाई सिताराम हळवे महाविद्यालय एन.एस.एस विभाग सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,दोडामार्ग आरोग्य विभाग यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =