You are currently viewing मुणगे गावचा सुपुत्र २५ लाखाचा मानकरी..

मुणगे गावचा सुपुत्र २५ लाखाचा मानकरी..

देवगड :

तालुक्यातील मुणगे बाबरवाडीचा सुपुत्र अक्षय सत्यविजय कदम या युवकाने सोनी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात भाग घेत पंचवीस लाख रुपयाचे बक्षीस पर्यंत मजल मारली आहे. आलेल्या संकटांना सामोरे जाणारे धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात 27 जून रोजी रात्री ९.०० वाजता आपल्याला अक्षय हॉट सीटवर बसलेला दिसणार आहे. मुंबई वडाळा येथे आपल्या कुटुंबीयांसह राहणारा अक्षय कदम हा लेखक आहे.

मध्यमवर्गीय घरातील अक्षयने घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

अक्षय कदम हा सध्या कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. आई-वडील आणि एक बहीण असा त्याचा परिवार आहे. अक्षयची आई घरकाम करीत वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होते पण कोरोनामुळे त्याचे काम बंद झाले. बहीण नायर हॉस्पिटल येथे डायलिसिस टेक्निशियन म्हणून काम करते.

शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रीम दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. त्याचा आईने खूप कष्ट केले आहे. याची जाणीव त्याला असल्याने तिला आराम द्यायचा आहे. अक्षयला टूर कंपनी सुरू करण्याचे स्वप्न आहे.ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमी कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याला आयसीयूमध्ये दुकान सुरू करायचे आहे आईस्क्रीमच्या दुकानात अक्षय काम केल्यामुळे त्याच्या जवळ तिकडचा अनुभव आहे.

मध्यमवर्गी अक्षय 25 लाख रुपयांपर्यंत पोचला असल्याने त्याचे मुणगे गाव, तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =