शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना जीवे मारणाऱ्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बुधवारी गुजरात येथून अटक

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना जीवे मारणाऱ्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बुधवारी गुजरात येथून अटक

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना जीवे मारणाऱ्याची धमकी देणाऱ्या एका २० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी बुधवारी गुजरातच्या जामनगर येथून अटक केली आहे. संशयित आरोपीची ओळख मनोज डोडिया अशी झाली आहे. या संशयित आरोपीने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोबाईलवर फोन केला होता. आरोपीने हिंदीमध्ये बातचीत केली होती तसेच महापौरांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात केस दाखल केली होती.

पोलिसांकडे केवळ मोबाईल नंबर होता आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोलीस आरोपी मनोजपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. मनोजला पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी पकडले होते. दरम्यान, आरोपीने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी का दिली होती याचा अद्याप तपास लागलेला नाही.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. पोलीस अधिकारी आरोपीला घेऊन गुरूवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचतील. त्यानंतर पोलीस कोठडीच्या मागणीसाठी मनोजला कोर्टात सादर केले जाईल. पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा