You are currently viewing जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून शहरात जनजागृती…

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून शहरात जनजागृती…

अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत रॅली काढून व बॅनर लावून जनजागृती

मालवण

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला आज मालवण शहरात ठिकठिकाणी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ दुष्परिणामांबाबत रॅली काढून व बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.

शहरी भागात तरुण मुले, विध्यार्थी, युवक हे ड्रग्ज व्यसनाच्या आहारी जात आहेत असे चित्र आहेत. ड्रग्ज सेवनामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. अमलीपदार्थ विरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एक पल का नशा..जीवनभर करी सजा… मादक द्रव्याची गोळी… करी जीवनाची होळी… असे सांगत जनजागृती केली जात आहे.

मालवण पोलिसांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब तसेच पोलीस कर्मचारी कैलास ढोले व कर्मचारी यांनी शनिवारी सायंकाळी मालवण शहरात जनजागृती केली. तसेच २६ व २७ जून रोजी गाव व शहर स्तरावर बॅनर लावून. छोट्या सभा घेऊन तसेच कॉलेज, महाविद्यालय व बाजारपेठा याठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा