You are currently viewing मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मालवण :

मालवण येथील शिवसेना शाखेत मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, बंड्या सरमळकर, महेंद्र म्हाडगुत, यशवंत गावकर, सिद्धार्थ जाधव, दीपक देसाई, उमेश मांजरेकर, नंदू गवंडी, मनोज मोंडकर, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, पंकज सादये, दत्ता पोईप कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ठिक ठिकाणी वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा