You are currently viewing विठ्ठलाचे दर्शनासाठी सर्व जन आतुर

विठ्ठलाचे दर्शनासाठी सर्व जन आतुर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

विठ्ठलाचे दर्शनासाठी सर्व जन आतुर
परब्रह्म पुंडलिकासाठी पंढरीत स्थीर।।धृ।।

पंढरीत क्लेशहारिणि चंद्रभागा तीर
स्वयंभु विठ्ठल प्रगटे भिमा तीरावर
भाग्य सर्वांचे आहे विठ्ठल उभा विटेवर।।१।।

विष्णू महेश कृष्ण सर्व रूप अवतार
आनंदाचा कंद भक्त प्रेमासाठी अधीर
सर्व संतांचे घडे दर्शन भक्तांसाठी माहेर।।२।।

महायोगाचे योगपीठ भिमा तिरावर
योगी होण्यासाठी विठ्ठल भक्तांना देती वर
योगी विठ्ठलाचे नामे भजन करू गजर।।३।।

काव्य:श्री अरुण गांगल, कर्जत.जिल्हा.रायगड.पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा