You are currently viewing हज यात्रेसाठी युवकाचा चक्क 8500 किलोमीटर चालत जाण्याचा संकल्प

हज यात्रेसाठी युवकाचा चक्क 8500 किलोमीटर चालत जाण्याचा संकल्प

कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्यासह कणकवलीकरांनी केले स्वागत

कणकवली

सिहान चतुर हा युवक केरळ मल्लपुरम येथून पायी मक्का मदीना हज यात्रेसाठी (8500 किलोमिटर) पाकिस्तान, इराक, इराण सौदी अरेबिया इथे निघाला असून, कणकवली येथे त्याचे 24 जून रोजी 11 वाजता विश्रामगृह येथे आगमन झाले. तिथे कणकवली तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने कणकवली तालुका मुस्लिम समाज अध्यक्ष आसिफ नाईक, सेक्रेटरी अजीम कुडाळकर, उपाध्यक्ष बड़ेमिया शेख, हनीफ पिरखान, अब्दुल नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर शिवाजी महाराज चौक येथे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यावेळी संदीप मेस्त्री, राजू गवाणकर सलाउद्दीन कुडाळकर, आक़िब कुडाळकर, निसार शैख़, अबिद नाईक, इम्रान शैख़, अनीस नाईक, जावेद शैख़ वसीम फकीर, इम्रान निशानदार, जावेद फकीर, असलम निशानदार, सलीम नाईक, अमजद शैख़ शोएल खान, शकील बाग़वन, सादिक कुडाळकर,नासीर शैख़, राजू खान, आमिर कुट्टी, मौलाना शाकिर अंसारी, मुददसर मुकादम आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =