You are currently viewing शिक्षकेतर कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने मळगाव इंग्लिश स्कूल, शाळेचे निर्जंतुकीकरण….

शिक्षकेतर कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने मळगाव इंग्लिश स्कूल, शाळेचे निर्जंतुकीकरण….

शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत बंद

सावंतवाडी
मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 RTPCR चाचणी करण्यात आली. सदर चाचणी मध्ये प्रशालेतील 2 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे शालेय कामकाज सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.


त्या निमित्त शालेय समितीचे चेअरमन, माजी सभापती राजू परब यांच्या मार्फत समाजसेवक संजू विर्नोडकर यांनी संपूर्ण शाळा व शालेय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवण सर तसेच पर्यवेक्षिका सावंत मॅडम, श्री.ठाकरे सर, कर्मचारी बाळा जाधव, विलास जाधव, रितेश राऊळ आदी उपस्थित होते.
संजू विर्नोडकर यांनी केलेल्या या कार्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. देवण सर यांनी त्यांचे आभार मानले.

निर्जंतुकीकरण करण्यात आल्या कारणाने शाळा सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे बंद राहील. संस्था आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून पुढील आदेश आल्या नंतर शाळा सुरू करण्यात येईल असे मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव शाळेच्या मुख्याध्यापकांनी कळवले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =