You are currently viewing शिवसेनेशी असलेली निष्ठा कधीही सोडणार नाही- आ. वैभव नाईक

शिवसेनेशी असलेली निष्ठा कधीही सोडणार नाही- आ. वैभव नाईक

शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत

कणकवलीत शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

अनेक आमदारांनी बंड केले असताना देखील शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले कुडाळ मालवणचे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी सर्व शिवसैनिक ठाम असल्याचा विश्वास देण्यासाठी आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले. आमदार वैभव नाईक यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जल्लोषी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढत छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेना जिंदाबाद!,उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है.! आ. वैभव नाईक यांचा विजय असो! कोण आला रे, कोण आला शिवसेनेचा वाघ आला!अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी भगवे झेंडे हाती घेत, भगव्या स्कार्प परिधान केल्याने वातावरण भगवेमय झाले होते.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, २००७ पासून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनेत कार्यरत आहे. त्यांनतर बाळासाहेब ,उद्धवसाहेब व शिवसैनिकांच्या आशीर्वादाने दोन वेळा आमदार झालो.मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले हेच अश्रू येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद वाढवतील. एकनाथ शिंदे नेहमी मला सन्मान द्यायचे परंतु आम्ही शिवसेनेशी असलेली निष्ठा सोडली नाही. यापुढच्या काळातही निष्ठेला तडा जाऊ देणार नाही. या बंडामागे संपूर्ण देशातील भाजप आहे. सीबीआय,ईडी मार्फत अनेक आमदारांवर दबाव टाकला जात आहे.महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ते उद्धवजी आजारी असताना देखील भाजपने त्यांच्यावर विविध मार्गाने वार केले. परंतु उद्धवजी ठाकरे या दबावाला झुकले नाहीत.शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना टीका करणाऱ्यांना पदे मिळाली असतील परंतु त्यांची गेलेली निष्ठा परत येणार नाही. आज जाणाऱ्यांना पदे मिळणार असतील तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. ज्या आईने आम्हाला जन्माला घातले, शिवसेनेने आम्हाला मोठे केले त्यांच्याशी आम्ही कधीही फारकत घेणार नाही. कोण येतील त्यांना घेऊन आणि जे नाही येतील त्यांना ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना वाढवायची आहे. येणारा काळ खडतर असला तरी डगमगता नये. शिवसेनेशी असलेली निष्ठा आपण सोडायची नाही. उद्धवजी ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. एक आमदार, जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक म्हणून मी शेवट पर्यत शिवसैनिकांच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना दिली.
याप्रसंगी संदेश पारकर, सतीश सावंत, अनिल हळदीवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत शिवसेनेशी ठाम राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. शिवसैनिकांनी उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,अनिल हळदीवे,सचिन सावंत, सुजित जाधव, रामू विखाळे,राजू राठोड,ललित घाडी, तेजस राणे,सुशील चिंदरकर,कृष्णा तेली,राजू जांभेकर, समीर हडकर, दीपक राऊत, नगरसेविका मानसी मुंज, कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री,उपसरपंच वैदेही गुडेकर,अनुप वारंग,भास्कर राणे,भूषण परुळेकर, सचिन आचरेकर, निसार शेख,बाबू पेडणेकर, प्रमोद कावले, सुभाष घाडी,सुदाम तेली, बाळू मेस्त्री, पप्पू परुळेकर, अरुण लाड, समीर परब, रिमेश चव्हाण, विलास गुडेकर, सचिन म्हाडगूत, प्रमोद मसुरकर, सोहम वाळके,प्रदीप सावंत,बाळू पारकर,संजय पारकर,हेमंत सावंत, भरत गावकर,संदीप गावकर,गणेश राणे, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, माधवी दळवी, धनश्री मेस्त्री, अनिषा सावंत, अर्चना कोरगावकर, मधुरा लोके, स्वरा डगरे, रोहिणी जेठे, सुमित्रा राठवड, दीपिका कारेकर, जयश्री राठवड, मनाली राठवड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा