You are currently viewing आ. नितेश राणेंची सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत चर्चा

आ. नितेश राणेंची सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत चर्चा

शहराच्या विकासकामांसंदर्भात विचारविनीमय

सावंतवाडी
विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत आलेल्या आ. नितेश राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेत भेट देत नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांसदर्भात विचार विनिमय केला.

यावेळी विरोधी गटनेत्या तथा सेनेच्या जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आमचे वाद हे व्यासपीठावर असून इतर वेळी मैत्रीचे संबंध आहेत. विकासासाठी आम्ही सोबत आहोत, अशी ग्वाही आ. नितेश राणे यांना दिली. यावेळी सेनेच्या नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, माधुरी वाडकर भाजप गटनेते राजू बेग, सभापती परिमल नाईक नगरसेवक सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, शहर मंडल अध्यक्षा मोहीनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =