You are currently viewing सुशिलाबाई ट्रस्टतर्फे उपलब्ध होणार विनामूल्य शववाहिनी..

सुशिलाबाई ट्रस्टतर्फे उपलब्ध होणार विनामूल्य शववाहिनी..

दोडामार्गात २७ रोजी होणार लोकार्पण

दोडामार्ग
दोडामार्ग शहरासह तालुकावासियांसाठी आता शयवाहिनी’ उपलब्ध होणार आहे. दोडामार्ग येथील उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ही शववाहिनी आणण्यात येत आहे. मंगळवारी दोडामार्गमध्ये या शववाहिनीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सर्व तालुकवासीयांसाठी ही शववाहिनी विनामूल्य असणार आहे. अशी माहिती नाईक यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही दिली. यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक राजू प्रसादी, मनोज पार्सेकर, युवराज ऐनापुरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा