You are currently viewing *⛳पंडूच्या पाथरी⛳*

*⛳पंडूच्या पाथरी⛳*

*⛳पंडूच्या पाथरी⛳*

 

आकेरी कोट बघून परताना होडावडे चावडीबाबत वाचन करताना *पंडूच्या पाथरीचा* उल्लेख आढळतो. ते ठिकाण झाराप येथे आहे. सावंतवाडीला जाताना झाराप पेट्रोल पंप च्या अलीकडून या ठिकाणी जाता येते. श्री देव चाळोबा देवस्थान म्हणजेच हे पंडूच्या पाथरी होय. मंदिराला पाठीमागे लागूनच दगडावर दगड असे मोठे दगड आपल्याला दिसतात. शांत असा हा परिसर असून वानरांचा येथे जास्त वावर आढळतो.

माधव कदम यांच्या पुस्तकात याबाबत एक छोटे कथानक आढळते. इ.स.१६१७ मध्ये कुडाळच्या किल्ल्यात जोगन प्रभू हे खेमसावंताच्या बरोबर लढत असताना मारले गेले. त्यावेळी त्याची मोठी बायको सती जावयास निघाली. सती समारंभाल बरेच लोक उपस्थित होते. त्यात कुडाळ देशस्थ प्रभू जातीचीही मंडळी होती. सती जाण्याची सर्व तयारी झाल्यावर जोगत प्रभूची सती जावयास निघालेली पत्नी कुडाळ देशस्थ प्रभू राजघराण्याचे सर्व शिक्के हातात घेऊन सती शिळेवरुन मोठ्याने म्हणाली, “कोण कुडाळ देशकर हे राजघराण्याचे शिक्के सांभाळण्यास तयार आहे काय? तिने तीन वेळा अशी विचारणा केली. परंतू कोणीही कुडाळ देशकर ब्राम्हण ते शिक्के घेण्यास पुढे आला नाही. त्यावेळी ती सती शापवाणी उद्‌गारली, ‘कुडाळातून कुडाळ देशकर आजच नष्ट झाले काय? नष्ट झाले नसतील तर यापुढे होवोत.’ ही शापवाणी उच्चारुन त्या सतीने कुडाळ देशकरांचा जवळच असलेला सेनापती दळवी यास समोर बोलाविले व त्याच्या हाती ते शिक्के व नारळ दिला. आणि म्हणाली, ‘हे शिक्के तू सांभाळ व ज्यावेळी तुझा नाईलाज होईल तेव्हा बोंब मार आणि हा नारळ फोड म्हणजे ईश्वर तुझ्यावरील संकट दूर करील’ असे म्हणून, तिने श्रीदेव नारायण व पंचमहाभुते आणि सभ्यजनांस वंदन करुन अग्नीप्रवेश केला.
सेनापती दळव्यांच्या हाती कुडाळ देशस्थ प्रभूच्या राजघराण्याचे देशमुखीचे शिक्के गेले. हे पाहताच खेमसावंतानी त्याचा पाठलाग केला व त्यास झाराप येथे ‘पंडूच्या पाथरी’ नावाचे जे आज खडक म्हणून ओळखले जातात त्या ठिकाणी गाठले. तेव्हा सतीच्या आज्ञेप्रमाणे सेनापती दळवी याने बोंब मारुन तो नारळ फोडला. क्षणार्धात लक्षावधी गांधील माशा निर्माण होऊन त्यांनी खेम सावंताच्या सैन्यास जर्जर करुन सोडले. ते पाहून खेम सावंतानी दळव्यांशी तहाचे बोलणे केले व दळवीला आपला सेनापती बनवले. होडावडे चावडीच्या चाळ्याचे देवपान करताना ही बोंब मारण्याची प्रथा अजूनही सुरु आहे.

गणेश नाईक
९८६०२५२८२५

https://www.facebook.com/share/r/Djp7zjfNpm5PFyN8/?mibextid=qi2Omg

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − fourteen =